सध्या राजकारणाने सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. नैतिकच नव्हे तर सामाजिक पातळीवरही राजकारणाचा स्तर घसरला आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत गलिच्छ राजकारणाची प्रचिती सर्वांनाच येत आहे. असे नैतिकता गमावलेले राजकारणी उजळमाथ्याने नैतिकचे पाठ पढवताना दिसत आहेत. यांना ईश्वर, अल्ला, देव यांची भीती तर नाहीच, पण जो मतदार आपल्याला मते देऊन आपले भाग्य घडवतो, त्यांच्याशी बेइमाने करण्याचे धाडसही त्यांच्या अंगी आले आहे. काही राजकारण्यांच्या नैतिकतेचे इतके पतन झाले की ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. आपल्या घरची इभ्रत वेशीवर टांगण्यासही कचरत नाहीत. समाजात ही भिणलेली घाण कसी साफ करायची, याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही.
एक उदाहरण सांगतो. लोकांना नैतिकतेचे पाठ शिकवण्याचा ठेका एका ठेकेदाराने स्वत:हून घेतला. काही लोक त्याचे ऐकतात, तर काही ऐकून सोडून देतात. फक्त या ठेकेदाराचे वय इतरांपेक्षा अधिक म्हणून त्याच्या वयाचा मान ठेवून लोक त्याचे ऐकून घेतात. पण या ठेकेदाराला लोक आपले ऐकतात, असा मोठाच गैरसमज झालेला. आयती लेकुरवाळी महिला घरात आणून ठेवत ती पत्नी असल्याचे तो सांगत आहे, असे त्याच्याच गटातल्या एका महिलेने हा भंडाफोड केला. ही वार्ता तिने कानोकानी पसरवली. विरोधी पक्षाच्याही हाती ही बातमी लगल्याचे ठेकेदाराला कळाले. त्याचे तोंड बंद करण्यासाठी विरोधीपक्षाचा नेता माझ्या खिडकीपर्यंत पोहोचला. तो माझ्या घरात डोकावून पाहत आहेत. अशा स्वरूपाचे खालच्या स्तराचे आरोप तो करत सुटला. हाही वार खाली गेला तर तो त्याही पुढे जाऊन अमूक व्यक्तीने माझ्या बायकोचा विनयभंग केला, असा आरोप करायलाही तो मागे-पुढे पाहणार नाही. आरोप काय करावेत, हेही या ठेकेदाराला कळले नाही.
असे हे गल्लीतील राजकारणच दिल्ली असो वा मुंबई सगळीकडेच दिसून येते. काही ठिकाणी आरोपांची पद्धत बदलते. कोणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करतो तर कुणी काही. राजकारण करताना या लबाडांकडून अनेक थोरांची नावे घेतली जातात. काही आम्ही धार्मिक असल्याचेही भासवतात. कोणी नमाज अदा करणारे तर कोणी देवळात घंटा वाजवणारे. विकासाचे राजकारण सोडून विरोधकांचे हाल कसे होतील, याचे मनसुबे आखण्याचे काम हे गलिच्छ राजकारणी २४ तास करतात. त्यांची सर्व ऊर्जा असाच विचार करण्यात क्षीण होते. लोकांच्या प्रश्नांकडे बघायला, सोडवायला वेळ अजिबात नसतो. शेवटी मराठीत म्हणच आहे, 'रिकामे डोके, सैतानाचे घर.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा