अस्वीकरण (disclaimer) : या उपहासात्मक कथेतील पात्र, प्रसंग काल्पनिक आहेत. याद्वारे कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. कुणाला कथेतील एखाद्या पात्राचा स्वत:शी काही संबंध वाटला तरीही तो योगायोगच समजावा.).....................................................
इंद्रदेवाला स्वर्गलोकाचा कंटाळा आला होता. म्हणून तो पृथ्वीतलावर आला. साक्षात इंद्रदेवच पृथ्वीच्या दिशेने निघाले म्हणून रंभा, उर्वशी, मेनकेलाही इंद्रासोबत पृथ्वीवर जाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी इंद्राकडे आम्हालाही पृथ्वीतलावर न्यावे, असा विनंती अर्ज केला. पण इंद्राने यासाठी टर्म्स आणि कंडिशन ठेवल्या. पृथ्वीतलावर असेपर्यंत तुम्हाला मानव म्हणून वावरावे लागेल. पृथ्वीतलावर पोहोचल्यावर तुम्हाला एका सामान्य व्यक्तीशी लग्न करावे लागेल. कारण तेथे एकट्या स्त्रीला बरेच लोक वेगळ्या नजरेने बघतात. बलात्कार, किडनॅपिंग, विनयभंग अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे सर्वांनी पुरुषाला भाऊ म्हणूनच संबोधावे. शिवाय त्या पुरुषालाही आपल्याला ताईच म्हणावे, असा आग्रह धरावा. पृथ्वीवर पोहोचताच एक फ्लॅट विकत घ्यावा लागेल. तेथे तुमच्या पतीराजांना बोलण्याची मुभा नसेल. जो काही कारभार करायचा तो मी (म्हणजे स्वत: इंद्र) आणि तुम्हीच (म्हणजे रंभा, उर्वशी आणि मेनका) करावयाचा आहे. आपापल्या पतीदेवांना सोमरसाच्या आधीन राहण्यास सांगितले तर अधिक चांगले. पृथ्वीतलावर मी (म्हणजे इंद्र) आणि आपापले पतीदेव वगळता इतर पुरुषांशी जास्त बोलायचे नाही, आपली ओळख लपवूनच पृथ्वीतलावर राहायचे. कोणत्याही प्रकारची तक्रार आली तर आधी माझ्याशीच डिस्कस करायची इत्यादी इत्यादी. या तिघींनी इंद्राच्या सर्व अटी क्षणार्धात मान्य करताच इंद्रानेही विनंती अर्जावर 'ओके'चा शेरा मारला. इंद्रदेव आणि त्याचा लवाजमा भल्या मोठ्या वाहनाने पृथ्वीतलावर दाखल झाला. पण पृथ्वीवर पोहोचताच इंद्र चक्रावून गेला. त्या नगरातील रस्ते अत्यंत छोटे होते. त्यामुळे स्वर्गलोकातून आणलेले वाहन त्या रस्त्यावरून चालणे कठीण होते. त्यामुळे त्याने ते वाहन रेल्वेस्टेशन शेजारी पार्क केले. तेथे पावती पुस्तक हाती धरलेल्या एका काळ्याभोर आणि धिप्पाड पोराने त्याला १०० रुपयांची पावती दिली.
'भाऊ हे १०० रुपये कशासाठी द्यायचे?' इंद्राने विचारले.
'नवा आलास कारे? याला पार्किंग फी म्हणतात?'
'अरे पण ही तर जागा भारत सरकारची ना? तुला पैसे का द्यायचे?' इंद्राने प्रश्न केला.
'अे मुकुटवाल्या.. जास्त शहाणपणा करू नगंस.. नाही तर ठेवून देईन एक..' काळा पोरगा चिडला.
उगीचच अप्सरांसमोर अपमान नको म्हणून इंद्राने दोन हजार रुपयांची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली.
' ए मुकुटवाला... छुट्टा देने का? इथं श्रीमंती दाखवायची नाय..' काळा पोरगा पुन्हा भडकला.
इंद्रदेवाकडे सुटे पैसे नव्हते. त्यामुळे रंभाने पुढाकार घेत गुढ्याला खोवलेली शंभराची नोट काढून त्या काळ्या पोराच्या हाती दिली. बाडबिस्तरा उचलून इंद्राचा लवाजमा पुढे निघाला. इंद्रदेव स्टेशन परिसरावर नजर फिरवू लागला. तेथे फुटपाथवर अनेक जण झोपलेले होते. इंद्राने चौकशी केली असता या लोकांकडे घरे नसल्याने ते दररोज येथेच झोपतात, असे सांगितले. त्यामुळे आपल्याला घर लवकर मिळेल की नाही, असा प्रश्न इंद्राला पडला. पण पृथ्वीवर खिशात पैसे असले की सर्व काही मिळते, हे इंद्राला नारदमुनीने सांगितले होते. त्यामुळे इंद्र निर्धास्त होता. रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडताच इंद्राचा पाय पाणी तुंबलेल्या खड्ड्यात पडला. तसे घाणेरड्या पाण्याचे शिंतोडे त्याच्या वस्त्रांवर उडले. रस्त्यावरील खड्डे ही महापालिकेची देण असल्याचे लवकरच त्याच्या लक्षात आले. उगीच खाचखळग्यांच्या रस्त्यांवर हिंडण्यात अर्थ नाही. आपण जवळच घर बघू असे ठरवत इंद्र आणि त्याचा ताफा स्टेशनला लागूनच असलेल्या आटपाटनगरातील एका चार-पाच मजली इमारतीत पोहोचला. तेथे बरीच घरे विक्रीची असल्याचे त्याला एका रहिवाशाने सांगितले. इंद्राने तेथील मालकमंडळीशी बोलून चार घरे विकत घेतली. एक घर रंभा, दुसरे उर्वशीला आणि तिसरे मेनकेला दिले. चौथ्या घरात खुद्द इंद्र राहायला गेला.
इंद्राच्या ताफ्यातील या ललनांकडे पाहून अनेक जण लाळ गाळू लागले. तेव्हा इंद्राने घालून दिलेली अट त्यांच्या लक्षात आली. रंभा, उर्वशी आणि मेनकाने आपापले वर निवडून त्यांच्याशी संसार थाटला. इंद्रदेव आधीच अनेक बायकांचा दादला होता. तरीही त्याला येथेही लग्न करण्याचा मोह आवरला नाही. तसेही स्वर्गलोकात आणि पृथ्वीतलावर पुरुषांनी कितीही लग्ने केली तरी चालतात, हेही नारदाने सांगितलेच होते. यासाठी त्याने अनुप जलोटा, शशी थरूर, आसाराम बापू, रामरहीम अशी काही नावेही सांगितली होती. त्यामुळे इंद्रानेही एक सामान्य महिलेशी विवाह केला.
काही दिवस लोटले. इंद्राने संपूर्ण शहराची माहिती करून घेण्यासाठी एक छोटे वाहन खरेदी केले. पण खड्डेमय शहरात फिरताना या वाहनातील पेट्रोल लवकर संपू लागले. अन्नधान्याची महागाई, जेथे जाईल तेथे पैसे लागत होते. त्यामुळे स्वर्गातून आणलेला खजिना संपू नये, याची त्याला चिंता होती. हा खजिना तसाच ठेवण्यासाठी आणि पार्ट टाईम उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे, असा यक्षप्रश्न त्याला पडला. राजकारणात खूप पैसा मिळतो, हे नारदाने सांगितले होते. कोळसा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा, चारा घोटाळा, बोफोर्स घोटाळा, राफेल घोटाळा असे कितीतरी घोटाळे पैसे मिळवण्याचे राजकारण्यांचे साधन ठरू शकतात, हेही नारदाने सांगितले होते. म्हणून राजकारणच इंद्राची फर्स्ट चॉईस ठरली. राजकारण प्रवेशासाठी त्याने धर्माच्या नावावर चालणाऱ्या एका पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. शेवटी तो इंद्रच... मानवापेक्षा त्याची बुद्धी श्रेष्ठच होती. काही दिवसांतच त्याने राजकारणावर मोठी पकड निर्माण केली. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या नीतींसोबत 'डिव्हाइड अॅण्ड रुल्ड' म्हणजेच 'फोडा आणि राज्य करा' या अस्त्रांचा वापर केला तर राजकारणात आडवे येणाऱ्यांना आडवे करता येते, असे नारदमुंनीनी सांगितल्याचे इंद्राला आठवले. यासाठी इंद्राने इंग्रजांचे उदाहरण दिले होते. ही अस्त्रे वापरून इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर कसे राज्य केले होते, हेही नारदमुनींनी इंद्राला पटवून दिले होते. या अस्त्रांच्या भरवशावर आपण पृथ्वीतलावर राज्य करू शकतो, याची इंद्राला पक्की खात्री पटली होती. हळूहळू इंद्राची प्रगतीकडे वाटचाल सुरू होती. राजकारणावरही त्याने पकड निर्माण केली. देशातीलच काय तर तो राहत असलेल्या आटपाटनगरातील प्रत्येक समस्या निवारण्यासाठी लोक त्याच्याकडेच येऊ लागले. स्वर्गातील देव आता पृथ्वीवरील लोकांचाही देव बनला होता. समस्या कुठल्याही प्रकारची असली तरी ती 'मीच सोडवणार', इतका इंद्राचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण एका गोष्टीची त्याला सारखी उणीव भासत होती. ती म्हणजे पृथ्वीतलावर त्यांच्यासोबत नारदमुनी आले नव्हते. पण त्यांची ही उणीव आटपाटनगरातीलच एका नारदीनं थोडी का होईना भरून काढली होती. नारदमुनी स्वर्ग, नरक, समुद्र, पाताळ, पृथ्वी अशा सर्वच ठिकाणची माहिती ठेवत होते. नारदमुनीएवढा या नारदीचा आवाका नसला तरी तिला तरी आटपाटनगरातील सर्व खबरी असायच्या. नारदमुनी देवदेवदांत भांडणे लावण्यात कुशल होते, तर या नारदीला माणसामाणसात भांडणे लावण्याची कला अवगत होती. रंभेची उर्वशीकडे तर उवर्शीची रंभेकडे चुगली करण्यातही ही नारदी पटाईत. पण तिला इंद्रदेवाने देवीचा दर्जा दिल्याने या सगळ्या अप्सरा तिलाही मानाचेच स्थान देऊ लागल्या. इंद्रदेवाने तर या नारदीला आपल्या खास लोकांत स्थान दिलेले होतेच. .
इंद्रासमोर अनेक जण वेगवेगळ्या समस्या घेऊन येत. एकदा तर खुद्द रंभाच समस्या घेऊन आली.
'महाराज.. महाराज... घोर अनर्थ झाला. मला न्याय द्या.. न्या द्या' रंभा ओरडतच आली.
घाबरलेल्या, बावरलेल्या रंभेला पाहून इंद्र काळजीत पडला. रंभेचा कोणी बलात्कार, विनयभंग तर केला नाही ना, अशी संशयाची पाल त्याच्या मनात चुकचुकून गेली.
'शांत हो रंभा.. काय विपरित घडलं ते शांतपणे सांग बघू', इंद्राने रंभाला शांत करत शांत स्वरात विचारले.
'कशी सांगू महाराज.. सांगायलाही जीभ वळेना. माझ्यावर अन्याय झालाय' असे म्हणत रंभा हंबारडा फोडून रडू लागली. रंभावर खरच अत्याचार झाला असणार, याची इंद्राला खात्री वाटू लागली. इंद्राने नारदीला आवाजा दिला.
'नारदे जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आत्ताच्या आता हजर कर !' इंद्रदेव करड्या स्वरात बोलला.
'होय महाराज' म्हणत नारदी तेथेून निघाली. चार पावले पुढे गेल्यावर पण हजर करायचे तरी कोणाला, हा प्रश्न नारदीला पडला. कारण इंद्रदेवावर अंधविश्वास ठेवणारी नारदी स्वत:च्या डोक्याने कधीच विचार करत नव्हती. पहिल्यांदाच तिला स्वत:चे डोके वापरावे लागले होते. ती माघारी फिरली.
'महाराज.. पण कोणाला हजर करायला सांगायचे?' तिचा इंद्राला प्रश्न होता.
'अरेच्चा ही तर गडबडच झाली. आरोपी कोण हे जाणून घेण्याआधीच मी त्याला हजर करण्याचा हुकूम कसा काय सोडला? इंद्र स्वत:च्या डोक्यावरील पांढरे केस खाजवत स्वत:शी पुटपुटला.
'अगं रंभे काय घडलं ते आधी सांग बघू!' इंद्राने रंभेला प्रश्न केला.
'महाराज... तो मोहनभाऊ माझ्याशी बोलला.' आवंढा गिळत रंभेने सांगितले.
'तर मग.. काय केले त्याने तुला?' इंद्राचा पुढचा प्रश्न होता.
'नाही महाराज.. काहीच केले नाही त्याने!' रंभेने प्रश्नाचे उत्तर दिले.
'मग तुझ्यावर असा घोर अन्याय झाला तरी काय?' इंद्राने खोदून विचारले.
'त्याचं काय महाराज... माझ्या नवऱ्याला मी कोणाशी बोललेले आवडत नाही. मोहनभाऊशी बोलताना माझ्या नवऱ्याने बघितले तर गजहब होऊ शकतो.' रंभाने अकलेचे तारे तोडले.
एखादा पुरुष स्त्रीसोबत बोलला तर काय गजहब होऊ शकतो. तसेही मोहन उच्च शिक्षित व्यक्ती आहे. तो मोहन आहे..मदनदेव थोडीच आहे. तो बोलला तर रंभेला एवढे आक्षेपार्ह वाटण्याचे कारण काय, असा प्रश्न इंद्रालाही पडला. पण मोहनपेक्षा रंभाच इंद्राला जवळची होती. रंभेला दुखवून कसे चालणार? तसेही मोहन आपल्या राजकारणात कधीमधी आडवा येतो, याचा इंद्राला थोडाबहुत राग होताच. 'फोडा आण राज्य करा' हे अस्त्र आता अचूकपणे वापरता येऊ शकते, याची इंद्राला कल्पना आली.
'हो का? तो मोहन तुझ्याशी बोललाच कसा? त्याची एवढी हिंमत?' इंद्र खवळला.
'मलाच नाही महाराज.. तो उर्वशी आणि मेनकेलाही बोलतो. ' रंभाने होते नव्हते तेवढे अकलेचे तारे तोडले.
'नारदे.. आता जा बघू... त्या मोहनसगट उर्वशी आणि मेनकेलाही बोलावून आण.' इंद्राने हुकूम सोडला.
नारदीनं आपले काम चोखपणे बजावले. इंद्राचा न्यायनिवाड्यासाठी दरबार भरला. मोहन आरोपीच्या पिंजऱ्यात होता.
'मोहन.. खरं सांग.. तू रंभेला काय बोलला?' इंद्राने सभेचे कामकाज सुरू केले.
'काही नाही महाराज.. रंभाताईशी मी शहराच्या राजकारणावर बोलत होतो. शहरातील रस्त्यांवर किती खड्डे पडलेत. चार दिवसांआड शहराला पाणी मिळत आहे. कचऱ्याचे ढीग गल्लोगल्ली जमलेत. सत्ताधारी नगरसेवक काहीच करत नाहीत. त्यांना पदावरून हटवून महिलांनीच आता पुढाकार घेऊन पालिकेची सत्ता हाती घ्यायला हवी, असे विचार मांडत होतो.' मोहनने स्पष्टीकरण दिले.
'काय रंभे.. असेच बोलला का हा मोहन?' इंद्राने प्रश्न केला.
'होय महाराज...' रंभा उत्तरली.
सभेचे कामकाज सुरू होते. रंभेच्या आरोपामुळे मोहन व्यथित झाला होता. पण इंद्रदेवापुढे त्याचे काहीच चालेना. इंद्रदेवही रंभा, उर्वशी आणि मेनकेला प्रोटेक्ट करण्यासाठी मोहनला अकलेचे धडे देऊ लागला.
'अरे मोहन.. असे महिलांशी बोलू नये. अशाने त्यांचा संसार मोडेल ना!' इंद्र म्हणाला.
'कसा महाराज?' मोहनने प्रतिप्रश्न केला.
'हेच.. की तू या महिलांशी बोलताे म्हणून.' इंद्राने तोच मुद्दा पुन्हा रेटला.
'हो महाराज.. एखादा पुरुष परस्त्रीशी बोलला म्हणून आजवर किती संसार मोडले?' मोहनने पुन्हा प्रतिप्रश्न केला.
'ते मला माहीत नाही.. पण मोडेल ना रे!' इंद्र तेच तेच तुणतुणे वाजवत होता.
बराच वेळ सभेत आरोप प्रत्यारोप, दावे, प्रतिदावे झाले तरी निवाडा होतच नव्हता. मोहनकडून वैचारिक लढाई हारलो तर या भूतलावर आपल्याला कुत्रेही विचारणार नाही, याचा इंद्राला बहुदा साक्षात्कार झाला असावा. म्हणून तो या तीन देव्यांच्या बाजूनेच राहिला.
सभा सुरू असतानाच तिल्लोत्तमेचा पतिदेव प्रकटला. त्याने सभेत काय चालले याचा अंदाज घेतला. मोहनला आरोपी ठरवले जातेय, हे त्याला कळाले. दरबारात आपणही आपली अक्कल पाजळून आपली बुद्धिमत्ता सिद्ध करू शकतो, याचा त्याला साक्षात्कार झाला. इंद्राबरोबरच तोही मोहनला ज्ञानाचे डोज देऊ लागला. एवढावेळ शांतपणे रंभा, मेनका आणि उर्वशीच्या आरोपांचा सामना करणारा मोहन चीडला. त्यात तिल्लोतमेच्या पतीनेही तोंड घातले होते. शेवटी मोहन मनुष्यप्राणीच.. तो काही ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा बुद्धही नव्हता. राग हा मनुष्याचा प्राकृतिक स्वभाव. तो रागाने लाल झाला.
'महाराज.. मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या?' मोहन उद्गरला.
'बोल मोहन... काय प्रश्न आहे तुझा?'
'मी जर काही वाईट बोललो असेल तर मला याच क्षणी फासावर लटकवा. नाही तर तुम्ही फाशी घ्या?' मोहनची पुरती सटकली होती.
'काय बोलतो हा माणूस? अरे तुझ्या जीभेला हाड आहे की नाही? हे बघ मी तुला शंभर कोडे मारण्याची शिक्षा देईल!' इंद्रदेव खवळून बोलला.
'अंगाला हात तर लावून बघ..' मोहन अचानक संतापला.
इंद्र आणि मोहनमध्ये खंडाजंगी सुरू झाली. तेवढ्यात तिल्लोतमेच्या पतीने या खडाजंगीत पुन्हा नाक खुपसले.
'इंद्रदेव, मेनका, रंभा, उर्वशी खऱ्या बोलत आहेत. तू असे महिलांशी बोलायला नको. तू तिल्लोतमेसोबतही बोलताना मी बघितले. ' तिल्लोतमेच्या पतीने दुसऱ्यांदा अकलेचे तारे तोडले.
' हो का? काय बोललो ते आधी विचार!' मोहनने तिल्लोतमेच्या पतीला प्रश्न केला.
'सांग गं काय बोलला हा?' तिल्लोतमेच्या पतीने तिला प्रश्न केला.
'नाही बुवा.. मोहनभाऊ तर काहीच बोलले नाही. ते तर मला भावासारखे आहेत?'
तिल्लोतमेचं उत्तर एेकून इंद्र आणि तिच्या नवऱ्याचे सर्व दात घशातच अडकले. तरीही उसणे अवसान आणत तिचा पती माघार घ्यायला तयार नव्हता. मुद्दयाची वाट सोडून त्याचे विमान भलतीकडेच भरकटले. ते जागेवर आणण्यासाठी मोहनची एक जोराचा ठोसा त्याच्या कानशिलावर पडला आणि भरदिवसा त्याला तारे दिसले. गडबडीने इंद्राला दरबार बरखास्त करून सर्वांना आपापल्या घरी जाण्यास सांगावे लागले. इंद्रदेवाचे त्याच्या फॉलोअर मंडळीने ऐकलेही. मोहनच्या एकाच फटक्यात दरबार बरखास्त झाला...
तर मंडळी... इंद्रदेव बुद्धिप्रामाण्यवादाने या खटल्याचा निवाडा देऊ शकत नव्हता. पण आटपाटनगरावर त्याचा जीव जडला होता. त्याला ही पृथ्वी सोडून स्वर्गात जायची इच्छाच राहिली नव्हती. आटपाटनगरातील राजकारण, रंभा, उर्वशी, मेनकाबरोबरच बऱ्याच महिलांनी त्याला देवत्व प्रदान केले होते. स्वर्गापेक्षाही इंद्राचे येथे जास्त फॉलोअर निर्माण झाले होते. रंभा, उर्वशी, मेनका, अप्सरा यांचे पतिदेव निमित्तमात्र आहेत. इंद्रदेव आणि नारदी यांचेच आटपाटनगरातील लोकांवर अधिराज्य. खोट्या प्रतिष्ठेतच त्याला मोठेपणा वाटू लागला. इंद्र अजून पृथ्वीवरच आहे. पुढचा कोणता आणि कसा खटला त्याच्या दरबारात येईल, हे सध्या तरी खुद्द इंद्रालाही माहीत नाही.

खूप छान आणि मनोरंजन करणारी .......
उत्तर द्याहटवाधन्यवाद भागवतजी...
हटवाExcellent writing
हटवा